Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर… अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत देशातील तरुणांच्या आंदोलनाबाबत महत्त्वाची भूमिका मांडली. तरुणांनी सरकारकडून राजीनामा घेतला, ही बाब कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

दीपके म्हणाले की, आंदोलन सुरू करताना एवढा मोठा परिणाम होईल, अशी कल्पनाही केली नव्हती. स्वतःला मोठा कॉकरोच न म्हणता, आपण त्यातील एक छोटा भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, तरुणांनी जे करून दाखवले, ते निश्चितच उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, अनेक राज्यांमध्ये आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याच्या हालचाली सुरू झाल्याचा दावा दीपके यांनी केला. महाराष्ट्र, बिहार आणि पश्चिम बंगालसह काही राज्यांनी यासंदर्भात नोटीस काढल्याचे त्यांनी सांगितले. दिल्ली सरकारसोबतही चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. या वेळी दीपके यांनी आंदोलनातील इनसाईड स्टोरी सांगितली त्यांनी सांगितले की मला स्वप्नतही वाटलं नव्हतं की आम्ही हे मिळवणार… इतकं मोठं आंदोलन होणार… मात्र हे झालं, आम्ही सिद्धी केलं.
तरुणांमध्ये असलेला संताप आणखी वाढला असून, सरकारने त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा दीपके यांनी दिला. दिल्लीत काही तरुणांवर गुन्हे दाखल होत असल्याचे फोनद्वारे समजत असून, त्यांना कोणतीही अडचण येऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.