नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला दिला पाठिंबा!

नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला दिला पाठिंबा!

| Updated on: Nov 25, 2026 | 6:31 PM

वर्सोवा येथील नाना नानी पार्कमधील वृक्षतोडीला स्थानिक रहिवासी आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला आहे. दहिसर कोस्टल रोड प्रकल्पासाठी ही वृक्षतोड प्रस्तावित आहे. नागरिकांनी सेव्ह नाना नानी पार्क मोहीम सुरू केली असून, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या मोहिमेला पाठिंबा दिला आहे.

वर्सोवा येथील नाना नानी पार्क येथे दहिसर कोस्टल रोड प्रकल्पासाठी प्रस्तावित असलेल्या वृक्षतोडीविरोधात स्थानिक रहिवासी आणि पर्यावरण कार्यकर्ते तीव्र आंदोलन करत आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नुकतीच या आंदोलन स्थळाला भेट दिली आणि आंदोलकांना आपला पाठिंबा जाहीर केला. मुंबई महानगरपालिकेच्या या वृक्षतोडीच्या निर्णयाला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.

नाना नानी पार्कमधील अनेक जुनी झाडे तोडण्याच्या प्रस्तावामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी आहे. याविरोधात नागरिकांनी सेव्ह नाना नानी पार्क ही मोहीम सुरू केली आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले आहेत. आदित्य ठाकरे यांनी आंदोलकांशी संवाद साधत, त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. त्यांच्या उपस्थितीने आंदोलकांना बळ मिळाले. यावेळी आदित्य साहेब पुढे चला, आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा घोषणा देत आंदोलकांनी त्यांच्या पाठींब्याचे स्वागत केले. हे आंदोलन मुंबईतील पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जात आहे.

Published on: Nov 25, 2026 6:31 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us