Ajit Pawar Death Update | उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा? सत्तामीकरणे बदलणार?

Ajit Pawar Death Update | उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा? सत्तामीकरणे बदलणार?

| Updated on: Jan 29, 2026 | 5:31 PM

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे आता अजित पवारांनंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण?, तसेच राष्ट्रवादी पक्षाचे काय होणार? असे प्रश्न विचारले जात आहेत. विशेष म्हणजे अजित पवार यांच्यानंतर आता राज्याचा नवा उपमुख्यमंत्री कोण होणार? असाही प्रश्न विचारला जातोय. मात्र राष्ट्रवादीत आता उपमुख्यमंत्री पदासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे आता अजित पवारांनंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण?, तसेच राष्ट्रवादी पक्षाचे काय होणार? असे प्रश्न विचारले जात आहेत. विशेष म्हणजे अजित पवार यांच्यानंतर आता राज्याचा नवा उपमुख्यमंत्री कोण होणार? असाही प्रश्न विचारला जातोय. मात्र राष्ट्रवादीत आता उपमुख्यमंत्री पदासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव आघाडीवर आहे, असं सांगितलं जातंय. असे असतानाच आता राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे यांनी नेमकं काय घडू शकतं? सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री होऊ शकतात का? यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना स्पष्ट केलं आहे. सुनेत्रा पवार यांना राजकारणाचा फारसा अनुभव नाही. परंतु सुनेत्रा पवार यांची वाढ आणि विकास हा राजकीय घराण्यातच झाला आहे. त्यामूळे सुनेत्रा पवार यांना तातडीने उपमुख्यमंत्री केलं जाऊ शकतं, असं संजीव उन्हाळे यांचं म्हणणं आहे. मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर जयंत पाटील किंवा सुप्रिया सुळे यांचा देखील उपमुख्यमंत्री पदासाठी विचार केला जाऊ शकतो, असंही उन्हाळे म्हणाले.

Published on: Jan 29, 2026 05:19 PM