Ajit Doval Speech | आता अजित डोवाल यांचे तरुणांवर मोठे विधान, म्हणाले, तरुणांनी…

| Updated on: Aug 01, 2026 | 3:11 PM

NSA अजित डोभाल यांचे टिळक पुरस्कार सोहळ्यातील भाषण चर्चेत आले आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी युवकांना राष्ट्रनिर्माणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. विशेषतः Gen Z पिढीने देशाच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.

डोभाल म्हणाले, “आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत विशेष आहे. लोकमान्य टिळकांसारख्या महान राष्ट्रपुरुषाच्या पुण्यतिथीच्या दिवशी हा पुरस्कार स्वीकारण्याचे भाग्य लाभले. मी पुण्यात शिक्षण घेत असताना टिळकांच्या विचारांवर व्याख्यान ऐकले होते. त्यावेळी कधी वाटले नव्हते की अनेक वर्षांनी त्यांच्या नावाचा पुरस्कार मला मिळेल,”

युवकांनी टिळकांच्या राष्ट्रनिर्माणाच्या विचारांचा अभ्यास करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. स्वातंत्र्याचा अर्थ केवळ मनाला वाटेल ते करणे नसून देशहिताची जबाबदारी स्वीकारणे असल्याचे डोभाल यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, “आज लोकमान्य टिळक असते तर कदाचित ते म्हणाले असते की ‘भारताला सशक्त आणि विकसित बनवणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.'” देशाला सक्षम आणि सुरक्षित बनवण्यासाठी नागरिकांनी योगदान द्यावे, नव्या पिढीने योगदान द्याव. तरुणांनी पुढे यावं” असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

Published on: Aug 01, 2026 3:01 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us