AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar - Sharad Pawar : केबिनमध्ये शरद पवारांना बघून अजितदादा परतले, बैठकीत मात्र सोबत बसले

Ajit Pawar – Sharad Pawar : केबिनमध्ये शरद पवारांना बघून अजितदादा परतले, बैठकीत मात्र सोबत बसले

| Updated on: Apr 21, 2025 | 11:12 AM
Share

Pune Sugar Complex AI Agriculture Meeting : पुण्यातल्या साखर संकुलात कृषीक्षेत्रातल्या AI वापराबाबत सध्या बैठक सुरू आहे. या बैठकीला शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्याचं बघायला मिळालं.

शरद पवार यांना केबिनमध्ये बसलेलं पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार परतले. अजित पवार आधी केबिनमध्ये गेले आणि त्या ठिकाणी शरद पवार यांना पाहून परतले. पुण्यातल्या साखर संकुलात कृषीक्षेत्रातल्या AI वापराबाबत सध्या बैठक सुरू आहे. या बैठकीला शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्याचं बघायला मिळालं. दरम्यान, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे देखील या बैठकीला उपस्थित आहेत. यावेळी अजित पवार केबिनमध्ये आले त्यावेळी तिथे शरद पवार बसलेले होते, तेव्हा त्यांना पाहून अजित पवार तिथून परतले. दुसरीकडे या बैठकीत मात्र अजित पवार आणि शरद पवार हे शेजारी शेजारी बसलेले बघायला मिळाले.

Published on: Apr 21, 2025 11:06 AM