VIDEO : मुख्यमंत्र्यांबद्दल असे अनुद्गार कोणीही काढले नव्हते, Ajit Pawar यांचा Narayan Rane यांना टोला

| Updated on: Jul 29, 2021 | 1:24 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपळूण दौऱ्यात फोन करुन जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही उपस्थित का नाही असा सवाल केला होता. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात व्यस्त असल्याचं म्हटलं होतं.

Follow us on

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणारे केंद्रिय मंत्री नारायण राणे  यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले आहे. काही नेतेमंडळी पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. प्रत्येकाला हा दौरा करण्याचा अधिकार आहे. आम्हीही विरोधी पक्षात असताना दौरे केले. पण त्यावेळी जिल्हाधिकारी कुठे आहे, तहसीलदार कुठे आहे, प्रांतधिकारी कुठे आहेत. याची विचारणा करत बसलो नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपळूण दौऱ्यात फोन करुन जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही उपस्थित का नाही असा सवाल केला होता. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात व्यस्त असल्याचं म्हटलं होतं. त्यावरुन नारायण राणेंनी “तो सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका” अशी भाषा वापरली होती.