Ajit Pawar Death in Plane Crash LIVE Updates: लॅंडींगला 5 मिनिटं उरलेलं असतानाच अजित पवारांवर काळाचा घाला!

Ajit Pawar Death in Plane Crash LIVE Updates: लॅंडींगला 5 मिनिटं उरलेलं असतानाच अजित पवारांवर काळाचा घाला!

| Updated on: Jan 28, 2026 | 11:44 AM

Maharashtra Deputy CM Ajit Pawar's plane crash Death in Baramati LIVE Updates : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीजवळच्या गोजुबावी गावात विमान अपघातात निधन झाले. सकाळी पावणे नऊच्या सुमारास त्यांचे प्रचार विमान धावपट्टीजवळ कोसळले. स्फोट होऊन विमानाला आग लागली, ज्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेने राज्यभरात शोककळा पसरली असून, बारामतीमध्ये नागरिकांची मोठी गर्दी जमली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज बारामतीजवळच्या गोजुबावी गावात झालेल्या विमान अपघातात निधन झाले. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी जात असताना, त्यांचे विमान विमानतळाजवळच एका शेतात कोसळले. सकाळी पावणे नऊच्या सुमारास हा अपघात घडला. विमान कोसळताच मोठा स्फोट होऊन त्याला आग लागली आणि ते पूर्णपणे जळून खाक झाले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, विमान लँडिंग करण्याचा प्रयत्न करत असतानाच धावपट्टीपासून दूर खाली कोसळले. या घटनेत अजित पवारांचा दुर्दैवी अंत झाला. ही बातमी समोर येताच संपूर्ण राज्यभरात हळहळ व्यक्त करण्यात आली. बारामतीमध्ये घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. पोलीस जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करत होते. या अपघातामुळे राजकीय वर्तुळात आणि पवार कुटुंबावर मोठा धक्का बसला आहे.

Published on: Jan 28, 2026 11:42 AM