
NCP Nitin Pawar : तुम्हाला एवढा माज, आता मी तुमची XXX… दादांच्या आमदाराची जीभ घसरली, आक्रमक होण्याचं कारण काय?
आश्रमशाळेतील प्रश्न, मुलभूत सुविधांवरून आमदार नितीन पवार अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकल्याचे दिसले. यावेळी त्यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले
नाशिक येथील आश्रमशाळांमधील समस्या आणि प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार यांनी काल एकात्मिक प्रकल्प कार्यालयासमोर ठिय्या मांडत आंदोलन केले. मात्र तब्बल पाच तास ठिय्या मांडूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून समर्पक असे उत्तर मिळत नसल्याने नितीन पवार हे चांगलेच संतापले. उपस्थित अधिकाऱ्यांना ‘तुम्हाला काय माज आला आहे एवढा, तुमचा माज मी जिरवतो.. ? मला XXX काढता का? असा सवाल करत खडे बोल सुनावले.
आश्रमशाळेतील प्रश्नांवरुन आमदार नितीन पवार आक्रमक झाले असून आमदार महोदयांची जीभ यावेळी घसरली. त्यानंतर त्यांनी पोलीस, अधिकाऱ्यांनाही मटका, दोन नंबर हे कुठलेच धंदे इथे चालू देवू नका मला सगळे धंदे बंद पाहिजे .असा सज्जड दमच भरला. तर जोपर्यंत आश्रमशाळांना शिक्षक मिळत नाही तोपर्यंत त्या शाळा बंदच ठेवा, असे सांगितले. आश्रमशाळांमधील शिक्षकांच्या जागा रिक्त असणे, बाह्यस्त्रोत शिक्षकांची भरती न होणे, जेवणाचा अत्यंत निकृष्ट दर्जा, आणि अन्य मूलभूत सुविधांचा अभाव यासह अनेक मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते.