
आम्हाला मंत्री करा म्हणता अन् विधानसभेत गैरहजर राहता, काहीतरी वाटलं पाहिजे…; अजित पवार आक्रमक
Ajit Pawar : राज्याचं विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान मंत्र्यांची अनुपस्थिती पाहायला मिळततेय. त्यावर अजित पवार भडकले. ते काय म्हणालेत? पाहा...
मुंबई : राज्याचं विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान शिंदे सरकारमधील मंत्र्यांची अनुपस्थिती पाहायला मिळत आहे. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात बोलताना टीका केली आहे. “आधी आम्हाला मंत्री करा म्हणता आणि अधिवेशनादरम्यान विधानसभेत गैरहजर राहतात, हे अत्यंत चुकीचं आहे. काहीतरी वाटलं पाहिजे”, असं अजित पवार म्हणालेत. “आज आठ लक्षवेधी सभागृहात मांडल्या जाणार होत्या. पण त्यातल्या सात लक्षवेधी त्या-त्या खात्याचे मंत्री उपस्थित नसल्यामुळे मांडता आल्या नाहीत. त्या लक्षवेधी पुढे ढकलाव्या लागल्या. हे गंभीर आहे”, असंही अजित पवार म्हणालेत.
Published on: Mar 15, 2023 12:01 PM
Related Video
काय बोलता! लँड रोव्हरने केवळ एका ग्राहकासाठी बनवली खास 'डिफेंडर V8'
2026 मधील सर्वाधिक सॉफ्टवेअर सपोर्ट असलेले सर्वोत्तम स्मार्टफोन्स
तो रक्ताच्या थारोळ्यात पडला अन् लोक बघत राहिले..; लोकलमध्ये काय घडलं?
केतन अग्रवाल प्रकरणात उज्वल निकम यांची एन्ट्री, फडणवीसांचा मोठा निर्णय
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी... मुख्यमंत्र्यांचं
राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमला; शिवाजी महाराजांच्या जिरे...