Pune | Ajit Pawar | भल्या पहाटे कासारसाई धरणाच्या मधोमध अडकले अजित पवार

| Updated on: Oct 08, 2021 | 10:20 AM

पुण्याच्या कासारसाई धरणाच्या मधोमध राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार अडकले होते. तराफ्यावर बसून मत्स्यव्यवसायाची पाहणी करायला आज भल्या पाहाटेच अजित पवार निघाले होते. तेव्हा तराफ्याचे इंजिन बंद पडले. चालकाने इंजिन सुरु करायचा प्रयत्न केला पण ती झाली नाही. शेवटी लगतची बोट जवळ घेण्यात आली आणि दादा त्यात बसले मग पुढचा प्रवास सुरु झाला.

Follow us on

पुण्याच्या कासारसाई धरणाच्या मधोमध राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार अडकले होते. तराफ्यावर बसून मत्स्यव्यवसायाची पाहणी करायला आज भल्या पाहाटेच अजित पवार निघाले होते. तेव्हा तराफ्याचे इंजिन बंद पडले. चालकाने इंजिन सुरु करायचा प्रयत्न केला पण ती झाली नाही. शेवटी लगतची बोट जवळ घेण्यात आली आणि दादा त्यात बसले मग पुढचा प्रवास सुरु झाला. सुरुवातीलाच अजित पवारांनी जास्तीचे लोक तराफ्यात बसवू नका अशी तंबी दिली होती. मात्र, तरीही उपस्थितांनी तराफ्यावर गर्दी केली आणि अधिकच्या वजनाने इंजिनवर ताण आला. त्यामुळे इंजिन बंद पडून तराफा मध्येच अडकला होता.