मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरूच, उद्या सर्वपक्षीय बैठकीत तोडगा निघणार?

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरूच, उद्या सर्वपक्षीय बैठकीत तोडगा निघणार?

Govinda Hatwar | Updated on: Sep 10, 2023 | 7:19 PM

उद्या मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर विचार केला जाणार आहे. अशी माहिती अजित पवार यांनी दिली. या बैठकीतून काही मार्ग निघतो का हे पाहावं लागेल.

मुंबई, १० सप्टेंबर २०२३ : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तेरावा दिवस आहे. जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर उद्या सर्वपक्षीय बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मेडिकल उपचारांचा त्याग केला. शिवाय ते आजपासून पाणीदेखील पिणार नाहीत. सरकारचा दुसरा जीआरदेखील जरांगे पाटील यांनी फेटाळून लावला. महाराष्ट्रातील मराठा समाजाला जातप्रमाणपत्र दिल्याशिवाय उपोषण थांबणार नाही. सरकारने त्यांच्या वेळेनुसार द्यावा, असंही जरांगे पाटील म्हणाले. अजित पवार म्हणाले, राज्यात जेवढे पक्ष आहेत. त्या सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक मुख्यमंत्री शिंदे यांनी सह्यांद्रीला बोलावली आहे. कुणबी समाजानंसुद्धा आमच्यामध्ये कुणाला बळजबरीने घालू नका, असं म्हटलं आहे. ओबीसींचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांची वेगवेगळी मतं आहेत. कुणालाही न दुखावता मार्ग निघाला पाहिजे. यात कुणाचेही दुमत नाही. इतरांना कुणाला धक्का लागू नये. इतर नेत्यांना काय म्हणायचं आहे, हेही समजून घेऊ. त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी सर्वपक्षीय बैठक उद्या बोलावण्यात आल्याचं अजित पवार यांनी म्हंटलं. त्यामुळे या बैठकीत काही निर्णय़ होतो का हे पाहावं लागेल.

 

Published on: Sep 10, 2023 7:18 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us