दिया मिर्झाचा दिवाळी व्हिडिओ पालिकेने हटवला; अमित साटम यांच्या आक्षेपानंतर काय घडलं?

दिया मिर्झाचा दिवाळी व्हिडिओ पालिकेने हटवला; अमित साटम यांच्या आक्षेपानंतर काय घडलं?

| Updated on: Nov 02, 2026 | 2:02 PM

मुंबई भाजपने दिवाळी जनजागृती मोहिमेवरून मुंबई पालिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अमित साटम यांच्या आक्षेपानंतर अभिनेत्री दिया मिर्झाचा दिवाळी जनजागृती व्हिडिओ पालिका प्रशासनाने सोशल मीडियावरून हटवला. आपल्या परंपरा खोलवर रुजलेल्या असून दिया मिर्झाकडून दिवाळी साजरी करण्याचे धडे घेण्याची गरज नसल्याचे साटम यांनी म्हटले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या दिवाळी जनजागृती मोहिमेवरून नवा वाद निर्माण झाला आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी पालिकेच्या या मोहिमेवर आक्षेप घेत सवाल उपस्थित केले आहेत. या मोहिमेत सहभागी असलेल्या अभिनेत्री दिया मिर्झाचा एक व्हिडिओ, साटम यांच्या आक्षेपानंतर मुंबई पालिकेच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हटवण्यात आला आहे. अमित साटम यांनी म्हटले आहे की, “दिवाळी कशी साजरी करावी याचे धडे आम्हाला दिया मिर्झाकडून घेण्याची गरज नाही. आमच्या परंपरा आणि संस्कृतीत खोलवर रुजलेल्या आहेत.” या ट्विटनंतर तातडीने पालिका प्रशासनाने दिया मिर्झाचा व्हिडिओ डिलीट केला.

मात्र, माधुरी दीक्षित, महेश कोठारे, स्वप्नील जोशी यांसारख्या इतर सेलिब्रिटींचे व्हिडिओ अजूनही मोहिमेचा भाग आहेत. पालिकेच्या जनसंपर्क कार्यालयाने न्यायालयाच्या निर्देशानुसार पर्यावरणपूरक दिवाळीसाठी जनजागृती मोहीम राबवत असल्याचे सांगितले. परंतु, दिया मिर्झाचा व्हिडिओ का हटवण्यात आला, याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. अमित साटम यांच्या आक्षेपानंतरच हा व्हिडिओ काढण्यात आल्याचे समोर आले आहे.

Published on: Nov 02, 2026 12:39 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us