केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3 तास बैठक

केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3 तास बैठक

| Updated on: Jul 20, 2026 | 6:33 PM

राजधानी दिल्लीत आज कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने संसद भवनावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलक आणि पोलिस आमनेसामने आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संसद भवनाकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिसांनी बॅरिकेड्स उभारले होते.

राजधानी दिल्लीत आज कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने संसद भवनावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलक आणि पोलिस आमनेसामने आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संसद भवनाकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिसांनी बॅरिकेड्स उभारले होते. मात्र, आंदोलकांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी आश्रुधुराचा वापर केला. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्जही करण्यात आला.

दुसरीकडे, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 3 तास चर्चा झाली. या भेटीत किरण रिजिजूदेखील उपस्थि होते. सूत्रांच्या माहितीनुसार, आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा आणि पुढील पावले यावर या बैठकीत चर्चा झाली.

दरम्यान, या घडामोडी सुरू असतानाच कॉकरोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत पक्षाने सरकारसमोर 3 प्रमुख मागण्या मांडल्या. त्यामध्ये सोनम वांगचूक यांच्या आंदोलनात अडथळा न आणता त्यांची सुटका करणे, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणे किंवा त्यांना पदावरून हटवणे आणि NEET परीक्षा प्रकरणात आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली.

Published on: Jul 20, 2026 6:24 PM
Follow Us