Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?

Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?

| Updated on: Aug 04, 2026 | 4:59 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिवंगत नेते अजित पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्याची मागणी केली आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार विक्रम काकडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी अजित पवार यांच्या नावाचा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मानासाठी विचार करण्याची विनंती केली.

अजित पवार यांच्या राजकीय आणि सार्वजनिक जीवनातील योगदानाचा गौरव व्हावा, अशी पक्षाची भूमिका आहे. यापूर्वी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी अजित पवारांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्याची मागणी करणारे सह्यांचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. केंद्र सरकारकडे याबाबत शिफारस करण्याची विनंतीही पत्रातून करण्यात आली होती.

अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रशासनात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यांनी दीर्घकाळ राज्याचे अर्थ खातेही सांभाळले. तसेच उपमुख्यमंत्री म्हणून अनेक वेळा पदभार स्वीकारत त्यांनी विक्रम केला होता.

28 जानेवारी 2026 रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. आता त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी पद्मविभूषण देण्याची मागणी पुढे आली आहे.

Published on: Aug 04, 2026 4:59 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us