पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!

पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!

| Updated on: Nov 16, 2026 | 11:51 AM

पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते दिवंगत नेते अजित पवारांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेच्या आवारात झालेल्या या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसने शक्तीप्रदर्शन केल्याचे मानले जात आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज पुण्यात दिवंगत नेते अजित दादा पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावर हा सोहळा पार पडला. अमित शहा दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असून, आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस होता. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक महत्त्वाचे नेते आणि मंत्री उपस्थित होते.

निमंत्रण पत्रिकेवर शरद पवारांचे नाव असले तरी, ते कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती आहे. त्यांच्याऐवजी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहिल्या. पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारालाही अजित दादांचे नाव देण्यात आले. या अनावरण सोहळ्याच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने आपले शक्तीप्रदर्शन केल्याचे मानले जात आहे. नेहरू मेमोरियल हॉल येथे एका छोट्या सभेचेही आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी जिल्हा परिषद परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Published on: Nov 16, 2026 11:51 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us