शरद पवार यांनी जनतेचा विश्वासघात केला

| Updated on: Jun 11, 2022 | 9:11 PM

राज्यसभा निवडणुकीचे निकाल लागले. त्यात महाविकास आघाडीने आतापर्यंत केलेल्या कामाचा परिणाम असल्याचं ते म्हणाले. शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाला. याचं कारण महाविकास आघाडीनं आतापर्यंत जे पेरलं ते उगवलं, अशी टीकाही श्रीकांत भारतीय यांनी केली.

Follow us on

भाजपचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार श्रीकांत भारतीय यांनी अमरावतीमध्ये आई वडिलांचे आशीर्वाद घेतले. कुटुंबाला भेटण्यासाठी व आई वडिलांचा आशीर्वाद घेण्यासाठी श्रीकांत भारतीय अमरावतीमधील त्यांच्या घरी आले होते. अमरावती महानगरपालिका निवडणुकीत ताकदीने भाजपचा प्रचार करणार आहेत. कालची लढाई ही विश्वासघात विरुद्ध विश्वास होती. अडीच वर्षांपूर्वी विश्वासघाताने हे सरकार आलं. या सरकारचा पिंडचं विश्वासघाताचा आहे. त्यांनी पेरलं ती उगवलं, असं ते म्हणाले. शरद पवार यांनी जनतेचा विश्वासघात केला. उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाचा पार्टीचा विश्वासघात केला, असा घणाघात श्रीकांत भारतीय यांनी अमरावतीत केला. अमरावती महानगर पालिका निवडणुकीत श्रीकांत भारतीय हे भाजपचा प्रचार करणार आहेत. राज्यसभा निवडणुकीचे निकाल लागले. त्यात महाविकास आघाडीने आतापर्यंत केलेल्या कामाचा परिणाम असल्याचं ते म्हणाले. शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाला. याचं कारण महाविकास आघाडीनं आतापर्यंत जे पेरलं ते उगवलं, अशी टीकाही श्रीकांत भारतीय यांनी केली.