…अन्यथा गटविकास अधिकाऱ्याला फटके मारु, अनिल बोंडे यांचं वादग्रस्त वक्तव्य
गटविकास अधिकारी चेतन जाधव यांच्यावर कारवाई केली नाही तर स्वतः गटविकास अधिकाऱ्यांना फटके मारू, अस वक्तव्य भाजप नेते व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केले. कंत्राटी तांत्रिक अधिकारी प्रमोद निंबुरकर यांच्या मृत्यूनंतर गटविकास अधिकारी चेतन जाधव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अनिल बोंडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.
माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी एका आंदोलनात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा पंचायत समितील रोजगार हमी योजनेतील कंत्राटी तांत्रिक अधिकारी प्रमोद निंबुरकर यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण मिळत आहे. अधिकारी मृत्यू प्रकरणात तिवस्याचे गटविकास अधिकारी चेतन जाधव यांच्यावर कारवाई केली नाही तर स्वतः गटविकास अधिकाऱ्यांना फटके मारू, अस वक्तव्य भाजप नेते व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केले. कंत्राटी तांत्रिक अधिकारी प्रमोद निंबुरकर यांच्या मृत्यूनंतर गटविकास अधिकारी चेतन जाधव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अनिल बोंडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली नाहीतर गटविकास अधिकाऱ्याला फटके मारू, असं वक्तव्य अनिल बोंडे यांनी केले आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
