बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्… बड्या मंत्र्याच्या भावाला मारहाणीचं वेगळंच कारण समोर

बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्… बड्या मंत्र्याच्या भावाला मारहाणीचं वेगळंच कारण समोर

| Updated on: Sep 11, 2026 | 9:26 AM

मंत्री अतुल सावेंच्या भावाला आणि पुतण्याला पैठणच्या बिडकीनमधील नायगाव खंडेवाडी येथे शेतजमिनीच्या आणि रस्त्याच्या वादातून मारहाण करण्यात आली आहे. अजित सावे आणि अमेय सावे यांच्यावर सध्या बिडकीनच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मारहाणीपूर्वीचा ग्रामस्थांशी संवादाचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे.

महाराष्ट्राचे मंत्री अतुल सावे यांच्या कुटुंबावर पैठण तालुक्यातील बिडकीनजवळील नायगाव खंडेवाडी येथे हल्ला झाला आहे. शेतजमिनीच्या बांधावरून आणि शेतात जाण्यासाठी असलेल्या रस्त्याच्या वादामुळे हा प्रकार घडला. या वादामध्ये मंत्री अतुल सावे यांचे मोठे बंधू अजित सावे आणि त्यांचा पुतण्या अमेय सावे यांना एका गटाकडून लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. सध्या अजित सावे आणि अमेय सावे यांच्यावर बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.

मारहाणीपूर्वीचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये नायगव्हाण-खंडेवाडी येथील ग्रामस्थ अजित सावेंना रस्ता का होऊ देत नाही अशी विचारणा करताना दिसत आहेत. अमेय सावे यांच्या पुतण्याने सांगितले की, एका गुंडवृत्तीच्या गटाने त्यांची गाडी अडवली आणि गाडीतून उतरलेल्या अमेयला रॉडने मारहाण केली. या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Published on: Sep 11, 2026 9:26 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us