आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने…. ठाकरेंचे आमदारही पक्षाला पाठ फिरवणार? व्हिडीओ समोर येताच मोठी खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली आहे. अलीकडेच शिंदे गटातील दोन मंत्र्यांनी याबाबत भाष्य केले. त्यानंतर आता एका व्हिडीओने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महाराष्ट्रात पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली आहे. अलीकडेच शिंदे गटातील दोन मंत्र्यांनी याबाबत भाष्य केले. त्यानंतर आता एका व्हिडीओने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आदित्य ठाकरेंच्या चाकण दौऱ्यातून आमदार बाबाजी काळे अचानक निघून गेल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. आदित्य ठाकरे यांच्या चाकण एमआयडीसी येथील पाहणी दौरा अर्धवट सोडून बाबाजी काळे अचानक गायब झाले. एवढेच नाही तर, आदित्य ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळीही आमदार काळे अनुपस्थित राहिले. त्यामुळे त्यांच्या अचानक अनुपस्थितीबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले. सुरुवातीला, बाबाजी काळे हे दौंड तालुक्यातील एका विवाह सोहळ्याला गेल्याची माहिती समोर आली होती. मात्र, त्यानंतर घडलेल्या एका घटनेमुळे या चर्चांना वेगळे वळण लागले आहे.
आमदार बाबाजी काळे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भीमाशंकर या तीर्थस्थळी भेट झाल्याची माहिती आता समोर आली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यातून अचानक निघून जाणे आणि त्यानंतर फडणवीसांसोबत भेटणे, यामुळे बाबाजी काळे यांच्या पुढील राजकीय वाटचालीबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. ही भेट केवळ योगायोग होती की यामागे काही राजकीय समीकरणे आहेत, यावर आता लक्ष लागले आहे.
