बेताल वक्तव्य करणाऱ्यासंभाजी भिडे यांच्यावर बच्चू कडू संतापले; म्हणाले…

बेताल वक्तव्य करणाऱ्यासंभाजी भिडे यांच्यावर बच्चू कडू संतापले; म्हणाले…

apeksha sakpal | Updated on: Jul 31, 2023 | 12:16 PM

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर आक्षेपार्ह विधान केलं आहे. त्यांच्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यभरातून निषेध व्यक्त जत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी संभाजी भिडे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.

अमरावती, 31 जुलै 2023 | संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर आक्षेपार्ह विधान केलं आहे. त्यांच्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यभरातून निषेध व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी संभाजी भिडे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. ते म्हणाले की,”संभाजी भिडेंना बेड्या ठोकल्या पाहिजेत. तिरंग्याचा अपमान आम्ही सहन करणार नाही.हे जर थांबल नाही तर संभाजी भिडे विरोधात आम्ही रोखठोक भूमिका घेऊ, सहा महिने तरी भिडे यांना देशाच्या बाहेर ठेवल पाहिजे.या देशात महात्मा गांधींच नाही, तर वीर सावरकर यांच्या बद्दल देखील बोललं गेलं. राहुल गांधी सावरकर यांच्याबद्दल बोलले; आता भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल चुकीच वक्तव्य केलं आहे. महापुरुषांवर टीका करताना आपली लायकी तपासली पाहिजे. संभाजी भिडे यांचं स्वातंत्र्यामध्ये योगदान काय आहे, कधी लाठी तरी खाल्ली का अशाप्रकारे बोलत असेल तर त्यांच्या नांग्या तिथेच ठेचल्या पाहिजे. भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर बोलले पाहिजे.”

 

 

Published on: Jul 31, 2023 12:12 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us