धनंजय मुंडेंना थेट… बीडमध्ये मोठं घडतंय? बजरंग सोनावणेंच्या विधानाने खळबळ
बीड जिल्ह्यातील विलास घुले हत्या प्रकरणामुळे सध्या जिल्ह्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव घेतलं जात अससल्याने आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. मृत विलास घुले यांच्या नातेवाईकांनी हल्ल्यावेळी सौरभ सोनवणे यांचे नाव घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे.
बीड जिल्ह्यातील विलास घुले हत्या प्रकरणामुळे सध्या जिल्ह्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव घेतलं जात अससल्याने आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. मृत विलास घुले यांच्या नातेवाईकांनी हल्ल्यावेळी सौरभ सोनवणे यांचे नाव घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. सौरभ सोनावणे हे बजरंग सोनावणे राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांचे चिरंजीव आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चर्चा संपूर्ण राज्यभर सुरू झाली आहे.
दरम्यान, विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आमदार धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी या हत्येमागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पंकजा मुंडे यांनीही दोषींवर तातडीने कारवाई व्हावी अशी भूमिका मांडली.
यावर आता खासदार बजरंग सोनवणेंना प्रश्न विचारण्यात येताच त्यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. “तो काय नेता आहे… मी कोणालाही घाबरत नाही. मी बीडचा वाघ आहे, मातीत येऊन काम करणाऱ्याला नेता म्हणातात, त्याच्या सारखं रात्री… जाऊ द्या मी आर्ध्या तासात याबाबत बोलतो.” अशा शब्दांत त्यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंना थेट आव्हान दिले. त्यांच्या या वक्तव्यानंतर बीडच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
