Beed : ॲपवर मैत्री करणं पडलं महागात! खासगी व्हिडीओच्या आधारे बीडच्या व्यापाऱ्याला तब्बल एवढ्या लाखांचा गंडा
बीडमधील एका उच्चशिक्षित व्यापाऱ्याकडून दोन नेपाळी तरुणींनी ब्लॅकमेल करून ४७ लाख रुपये उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ॲपवर ओळख करून खासगी व्हिडीओ रेकॉर्ड करत तो व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे मागितले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यातील एका उच्चशिक्षित व्यापाऱ्याला ब्लॅकमेल करून तब्बल ४७ लाख रुपये उकळल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोन नेपाळी तरुणींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणींनी एका ॲपच्या माध्यमातून या व्यापाऱ्यासोबत ओळख वाढवली होती.
ओळख वाढल्यानंतर, आरोपी महिलांनी व्यापाऱ्याचा काही खासगी व्हिडीओ रेकॉर्ड केला. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्यांनी व्यापाऱ्याकडे पैशांची मागणी केली. ब्लॅकमेलिंगच्या या प्रकारातून तरुणींनी व्यापाऱ्याकडून बँक खाती आणि क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून ४७ लाख रुपये उकळले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, सायबर गुन्हेगारीचा हा नवा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
Published on: Nov 02, 2026 1:27 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
