Thane Political Brawl: ठाण्यात भाजपवाल्यांकडून शिंदेंच्या पदाधिकाऱ्याच्या कानाखाली, नेमकं घडलं काय?
ठाण्यात भाजप आणि शिंदे गट कार्यकर्त्यांमध्ये बीएसयूपी योजनेच्या श्रेयवादावरून जोरदार राडा झाला. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांच्यावर मारहाणीचा आरोप करत पोलिसांत तक्रार केली आहे. मात्र, नारायण पवार यांनी हे आरोप फेटाळत निवडणुका जवळ असल्याने स्टंटबाजी सुरू असल्याचे म्हटले आहे. या घटनेमुळे दोन्ही मित्रपक्षांमधील वाद उघड झाला आहे.
ठाण्यात भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बीएसयूपी योजनेच्या श्रेयवादावरून वाद होऊन परिस्थिती चिघळल्याचे समोर आले आहे. शिंदे गटाचे शाखाप्रमुख हरेश महाडिक आणि उपविभागप्रमुख महेश लहाणे यांनी भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांच्यावर मारहाणीचा आरोप केला आहे. १०० रुपयांमध्ये मुद्रांक शुल्क योजनेचा जल्लोष करत असताना नारायण पवार यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप हरेश महाडिक यांनी केला आहे.
हरेश महाडिक यांनी नौपाडा पोलिसांत नारायण पवार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. दुसरीकडे, नारायण पवार यांनी हे आरोप फेटाळून लावले असून, निवडणुका जवळ आल्यामुळे ही ‘स्टंटबाजी’ असल्याचा दावा केला आहे. ज्या लक्ष्मीनारायण गृहनिर्माण संस्थेत हा प्रकार घडला, त्या संस्थेच्या अध्यक्षांनी धक्काबुक्की झाल्याचे मान्य केले असले तरी मारहाण झाल्याचे नाकारले आहे. भाजप आणि शिंदे गटातील हा संघर्ष ठाणे जिल्ह्यात वाढताना दिसत आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

