tv9 Special Report | मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात सत्ताधारी-विरोधकांमध्ये घोषणाबाजी
मुंबई महापालिकेत अखेर महापौर आणि उपमहापौर विराजमान झाले असून तब्बल 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर खुर्चीवर विराजमान झाला आहे. मात्र पदभार स्वीकारण्याच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार घोषणाबाजी होत राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले. महापौरपदी रितू तावडे यांनी तर उपमहापौरपदी एकनाथ शिंदे गटाचे संजय घाडी यांनी शपथ घेतली.
मुंबई महापालिकेत अखेर महापौर आणि उपमहापौर विराजमान झाले असून तब्बल 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर खुर्चीवर विराजमान झाला आहे. मात्र पदभार स्वीकारण्याच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार घोषणाबाजी होत राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले. महापौरपदी रितू तावडे यांनी तर उपमहापौरपदी एकनाथ शिंदे गटाचे संजय घाडी यांनी शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही मंत्र्यांची उपस्थिती होती.
दरम्यान, शपथविधीच्या वेळी काँग्रेसच्या नगरसेवकांना बसण्यासाठी जागा न मिळाल्याचा आरोप करण्यात आला. यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. महापौर निवडीनंतर काँग्रेस नगरसेवकांनी व्यासपीठावर चढून निदर्शने केली. या घडामोडींमुळे महापालिकेतील राजकारण चांगलेच तापले असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
