Nitesh Rane यांचं थेट आव्हान, ‘हिंमत असेल तर आदित्य ठाकरे यांनी…’

Nitesh Rane यांचं थेट आव्हान, ‘हिंमत असेल तर आदित्य ठाकरे यांनी…’

Harshada Shinkar | Updated on: Oct 03, 2023 | 4:57 PM

VIDEO | 'दुसऱ्याचे बळी घेण्यापेक्षा स्वतःच्या मुलाला निवडणूक लढवण्यासाठी उभे करा, बघा कुठेतरी आदित्य ठाकरे निवडून येतात का?', नितेश राणे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. तर वरळीतून आदित्य ठाकरेंना निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले

मुंबई, ३ ऑक्टोबर २०२३ | भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘हिमंत असेल तर आदित्य ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी’, असे म्हणत भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी थेट आव्हान दिले आहे. इतकेच नाहीतर वरळीमध्ये सुनील शिंदे यांचा बळी गेलाय आता शिवडीमध्ये अजय चौधरी यांचा बळी जाणार, असंही नितेश राणे यांनी म्हटले आहे. तर दुसऱ्याचे बळी घेण्यापेक्षा स्वतःच्या मुलाला निवडणूक लढवण्यासाठी उभे करा, बघा कुठेतरी आदित्य ठाकरे निवडून येतात का? असे म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक सवाल केला आहे. मुंबईमध्ये तुमची ताकद राहिली आहे का? तुमचे कार्यकर्ते, नगरसेवक राहिले आहे का? असा सवाल करत नितेश राणे यांनी वरळीतून आदित्य ठाकरे यांनी निवडूक लढवण्याचे आव्हान दिले आहे.

Published on: Oct 03, 2023 4:57 PM
Follow Us