Narayan Rane | नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल

Narayan Rane | नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल

| Updated on: Feb 10, 2026 | 4:49 PM

भाजपचे नेते आणि खासदार नारायण राणे यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना हृदयाशी संबंधित आजारावर उपचार करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भाजपचे नेते आणि खासदार नारायण राणे यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना हृदयाशी संबंधित आजारावर उपचार करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कणकवलीत स्थानिक नगर पंचायत निवडणुकांमध्ये भाजपाच्या यशानंतर नारायण राणे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात त्यांनी केलेल्या भाषणात म्हटले होते की, “आता थकलो आहोत, आणि किती करणार याला काही मर्यादा असतात.” तसेच, त्यांनी आपल्या दोन्ही मुलांबद्दल सांगितले की, ते अत्यंत कर्तृत्ववान असून, त्यांना त्यांच्या क्षेत्रात यश मिळाले आहे. नारायण राणे यांनी आपल्या मुलांना आशीर्वाद देताना “नांदासौख्य भरे” अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या आरोग्याबद्दल राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण आहे.

Published on: Feb 10, 2026 04:49 PM