Chotu Bhoyar | लोकशाहीचा अपमान करून भाजप विजयी, पराभवानंतर छोटू भोयर यांची प्रतिक्रिया

Chotu Bhoyar | लोकशाहीचा अपमान करून भाजप विजयी, पराभवानंतर छोटू भोयर यांची प्रतिक्रिया

नागपूर विधन परिषद निवडणुकीत आज भाजपच्या विजयापेक्षा काँग्रेसच्या छोटू भोयर यांच्या पराभवाचीच चर्चा जास्त रंगलीय. छोटू भोयर यांची कारकीर्द भाजपात गेली. गडकरींसोबत त्यांनी पक्षाचं काम केले. नगरसेवक ते ज्येष्ठ नगरसेवक अशी कारकीर्द गाजवली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Dec 14, 2021 | 3:02 PM

नागपूर विधन परिषद निवडणुकीत आज भाजपच्या विजयापेक्षा काँग्रेसच्या छोटू भोयर यांच्या पराभवाचीच चर्चा जास्त रंगलीय. छोटू भोयर यांची कारकीर्द भाजपात गेली. गडकरींसोबत त्यांनी पक्षाचं काम केले. नगरसेवक ते ज्येष्ठ नगरसेवक अशी कारकीर्द गाजवली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत ते घडले. पण गेल्या काही दिवसांपासून पक्षात अपमान होत असल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसनं त्यांना उमेदवारी दिली, पण भोयर हे प्रचारास रस दाखवत नसल्यानं काँग्रेसनं अपक्ष मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या भोयर यांना कुणीही मत दिलं नाही. मतमोजणीत चंद्रशेखर बावनकुळे यांना 362, डॉ. रवींद्र भोयर (छोटू भोयर) यांना 1 तर मंगेश सुधाकर देशमुख यांना 186 अशी मतं पडली.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें