Blinkit Riders Strike : अंबरनाथमध्ये ब्लिंकिटची सेवा आठ दिवसांपासून ठप्प, पगार कपात अन्…; 100 ते 150 रायडर्सचा संप

Blinkit Riders Strike : अंबरनाथमध्ये ब्लिंकिटची सेवा आठ दिवसांपासून ठप्प, पगार कपात अन्…; 100 ते 150 रायडर्सचा संप

| Updated on: Nov 15, 2026 | 9:19 AM

अंबरनाथमध्ये ब्लिंकीटचे रायडर्स कमी झालेल्या पेआऊट आणि वाढत्या इंधन दराच्या निषेधार्थ संपावर गेले आहेत. पूर्वीच्या कमाईसाठी आता दुप्पट वेळ लागत असल्याने आणि प्रति ऑर्डर मिळणारे पैसे कमी झाल्याने त्यांना आर्थिक नुकसान होत आहे. मागील आठ दिवसांपासून ब्लिंकीट सेवा ठप्प आहे.

अंबरनाथमध्ये ब्लिंकीट कंपनीचे रायडर्स गेल्या आठ दिवसांपासून संपावर गेले आहेत. पगार कपात आणि वाढत्या इंधन दरामुळे रायडर्सना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संपामुळे अंबरनाथमधील ब्लिंकीटची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.

रायडर्सच्या म्हणण्यानुसार, पूर्वी जेवढे पैसे दहा तासांत मिळत होते, तेवढ्या कमाईसाठी आता १५ ते १७ तास काम करावे लागते. पेट्रोलचे दर वाढल्यामुळे आणि प्रति ऑर्डर मिळणाऱ्या रकमेत घट झाल्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. मॅनेजमेंटशी चर्चा करूनही कोणताही तोडगा निघालेला नाही, असे रायडर्सनी सांगितले. व्यवस्थापनाने प्रति ऑर्डर मिळणारे पैसे ६०-७० रुपयांवरून ३७-४० रुपयांपर्यंत कमी केले आहेत. तसेच, ४.१ किलोमीटरच्या डिलिव्हरीसाठी मिळणारे ६२-६४ रुपये आता ४२-४३ रुपये करण्यात आले आहेत.

ब्लिंकीट व्यवस्थापनाने लवकरात लवकर यावर तोडगा काढून रायडर्सच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी आंदोलक रायडर्स करत आहेत. सुमारे १०० ते १५० रायडर्स या संपात सहभागी आहेत.

 

Published on: Nov 15, 2026 9:19 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us