अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्… एका मतासाठी भाजपनं BMC तील नगरसेवकाला रुग्णालयातून आणलं, Video व्हायरल
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीतील बहुमत टिकवण्यासाठी सत्ताधाऱ्यांना आजारी नगरसेवकाला रुग्णालयातून थेट बैठकीत आणावे लागल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

जुलैच्या शेवटच्या आठवड्यात स्थायी समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी भाजपचे नगरसेवक शिवकुमार झा हे प्रकृती अस्वस्थ असतानाही रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन बैठकीला उपस्थित राहिले. महत्त्वाच्या प्रस्तावांवरील मतदानासाठी सत्ताधाऱ्यांचे संख्याबळ कायम ठेवणे गरजेचे होते.
स्थायी समितीत सत्ताधारी पक्षाकडे 13 सदस्य, तर विरोधकांकडे 12 सदस्य आहेत. मात्र बैठकीच्या दिवशी शिंदे सेनेच्या यामिनी जाधव उपचारासाठी रुग्णालयात होत्या आणि भाजपच्या राखी जाधव रजेवर होत्या. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसमोरील अडचण वाढली होती.
शिवकुमार झा यांनी प्रकृती ठीक नसतानाही अंगावर भागलपुरी शाल आणि कानांवर रुमाल बांधून बैठकीला हजेरी लावली. त्यांना थंडीचा त्रास होत असल्याचेही दिसून आले. GST संबंधित प्रस्तावावरील मतदानात सहभागी झाल्यानंतर बैठक संपण्याच्या काही मिनिटे आधी त्यांना परत जाण्याची परवानगी देण्यात आली.