धक्कादायक ! काय सांगताय… पुण्यातील जंगलात बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण?

धक्कादायक ! काय सांगताय… पुण्यातील जंगलात बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण?

| Updated on: Jul 29, 2023 | 9:31 AM

VIDEO | पुण्यात अटक केलेल्या दहशतवाद्याकडून तपासातून काय झाली धक्कादायक माहिती उघड?

पुणे, 29 जुलै 2023 | पुण्यातील नाकाबंदीदरम्यान, पुणे पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर ताब्यात घेतलेल्यांचा एटीएसकडून कसून तपास करण्यात आला. सध्या त्यांची एटीएसकडून चौकशी सुरू असताना धक्कादायक माहिती आणि खुलासे समोर आले आहेत. पुण्यात अटक केलेल्या दहशतवाद्याकडून तपासातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पुण्यातील जंगलात बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण दिल्याचं तपासातून समोर आलं आहे. एटीएसकडून करण्यात आलेल्या तपासात ही माहिती उघड झाली आहे. सातारा, कोल्हापूर, पुणे येथील जंगलात प्रशिक्षण घेतल्याची माहिती आता या तपासातून समोर आली आहे. दरम्यान, पुण्यातच दहशतवादी तयार करण्याचं कट घडवण्याचा प्रयत्न या दहशतवाद्यांचा होता, असे सांगितले जात आहे.

Published on: Jul 29, 2023 09:31 AM