Mumbai | चंद्रशेखर बावनकुळे अचानक राज ठाकरेंच्या भेटीला, भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Mumbai | चंद्रशेखर बावनकुळे अचानक राज ठाकरेंच्या भेटीला, भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

| Updated on: May 07, 2026 | 2:15 PM

राज्यातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आणणारी एक महत्त्वाची भेट आज मुंबईत पार पडली. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र, या भेटीमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या या भेटीचे काही फोटो समोर आले असून, राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे.
दरम्यान, भेटीनंतर शिवतीर्थाबाहेर उपस्थित माध्यम प्रतिनिधींनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणतीही प्रतिक्रिया न देता ते त्वरित निघून गेले. त्यामुळे या भेटीमागील राजकीय संकेत काय आहेत, याबाबत उत्सुकता अधिक वाढली आहे. या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून, पुढील काही दिवसांत याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: May 07, 2026 2:14 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us