Chhagan Bhujbal Oath : छगन भुजबळ उद्या मंत्रिपदाची शपथ घेणार? ‘या’ खात्याचा बघू शकतात कारभार

Chhagan Bhujbal Oath : छगन भुजबळ उद्या मंत्रिपदाची शपथ घेणार? ‘या’ खात्याचा बघू शकतात कारभार

| Updated on: May 19, 2025 | 11:25 PM

Chhagan Bhujbal oath ceremony : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ उद्या मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ उद्या मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्या सकाळी 10 वाजता हा शपथविधी सोहळा राजभवनात पार पडणार असल्याचं देखील सुत्रांकडून सांगण्यात आलेलं आहे.

महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांना डावलण्यात आलेलं होतं. त्यानंतर आपली नाराजी भुजबळ यांनी अनेकवेळा बोलून देखील दाखवली होती. संपूर्ण ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून भुजबळांकडे पाहिलं जातं. त्यांनी राज्यात सातत्याने ओबीसी समाजाचं नेतृत्व देखील केलेलं आहे. असं असतानाही त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानंतर मोठी नाराजी ओबीसी समाजाकडून व्यक्त केली जात होती. त्यानंतर आता भुजबळ हे उद्या मंत्रिपदाची शपथ घेतील असं सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांचं अन्न व नागरी पुरवठा खातं भुजबळ यांना मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे.

Published on: May 19, 2025 11:25 PM