Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून…., नेमकं काय घडलं?

Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून…., नेमकं काय घडलं?

| Updated on: Sep 29, 2026 | 9:01 AM

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका धक्कादायक बाळ विक्री प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्याने आपल्या एक महिन्याच्या बाळाची 1.20 लाख रुपयांना विक्री केली. त्या पैशातून त्यांनी स्मार्टफोन आणि सोने खरेदी केले. आंतरराज्यीय बाळ विक्री रॅकेटमधील जन्मदात्यांसह सात आरोपींना अटक करण्यात आली असून, हैदराबादमधून बाळाला सुखरूप परत आणण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका गंभीर बाळ विक्री प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याने आपल्या अवघ्या एक महिन्याच्या बाळाची 1 लाख 20 हजार रुपयांना विक्री केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार. बाळाची विक्री केल्यानंतर या जोडप्याने ब्रँडेड स्मार्टफोन आणि 62 हजार रुपयांचे सोने खरेदी केले. पोलिसांनी या प्रकरणी वेगाने कारवाई करत आंतरराज्यीय बाळ विक्री रॅकेटमधील जन्मदात्या दाम्पत्यासह एकूण सात आरोपींना अटक केली आहे.

तपासात असेही उघड झाले आहे की. अवघ्या 48 तासांच्या आत या बाळाची नांदेडमार्गे तेलंगणात चार हातून तस्करी करण्यात आली होती. पोलीस पथकाने कसून तपास करत हैदराबाद येथून बाळाला सुखरूप परत आणले आहे. पहिल्या पती-पत्नीपासून विभक्त होऊन लिव्ह-इनमध्ये राहत असताना त्यांना बाळ झाल्यामुळे त्यांनी त्याची विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Published on: Sep 29, 2026 9:01 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us