न माथेरान न महाबळेश्वर, महाराष्ट्रातील या पर्यटनस्थळी एका दिवसाला 15 हजारांहून अधिक पर्यटक देतात भेट, पहा…

न माथेरान न महाबळेश्वर, महाराष्ट्रातील या पर्यटनस्थळी एका दिवसाला 15 हजारांहून अधिक पर्यटक देतात भेट, पहा…

| Updated on: Aug 03, 2026 | 12:13 PM

महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हटलं की माथेरान आणि महाबळेश्वर ही नावे आवर्जून घेतली जातात. मात्र, याचबरोबर अमरावतीतील चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाणही पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. अमरावती जिल्ह्यातील चिखलदऱ्याला वर्षभर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. विशेषतः सुट्टीचे दिवस आणि रविवार असल्यास येथे पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते.

डोंगररांगा, हिरवाई, धुक्याची चादर आणि आल्हाददायक वातावरण यामुळे चिखलदरा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. पावसाळ्यात येथील निसर्ग आणखी खुलून दिसतो. धुक्यात हरवलेले रस्ते आणि डोंगरांचा सुंदर नजारा पर्यटकांना आकर्षित करतो.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी चिखलदऱ्यात 15 हजारांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली. त्यामुळे पर्यटनस्थळी मोठी गर्दी पाहायला मिळाली. रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढली असून विविध पर्यटनस्थळांवर पर्यटकांची लगबग दिसून आली. त्यामुळे चिखलदरा हे महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Published on: Aug 03, 2026 12:13 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us