Chitra Wagh : सामनात छापला इंग्रजीत मथळा करून ठेवा फ्रेम, चित्रा वाघ यांची कवितेतून ठाकरेंवर टीका

Chitra Wagh : सामनात छापला इंग्रजीत मथळा करून ठेवा फ्रेम, चित्रा वाघ यांची कवितेतून ठाकरेंवर टीका

| Updated on: Jun 30, 2025 | 6:39 PM

Chitra Wagh Slams Udhav Thackeray : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आता कवितेतून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आता कवितेतून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. अशांना कधीच जाग येत नसते, जे घेतात झोपेचं सोंग, ओळखा पाहू कोण? असं चित्रा वाघ यांनी म्हंटलेलं आहे. राज्यात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेलं असतानाच ठाकरे बंधूंनी पुकारलेल्या एल्गार समोर सरकारला अखेर आपली भूमिका बदलावी लागलेली आहे. पहिलीपासून हिंदी सक्तीचा जीआर सरकारने रद्द केलेला आहे. त्यानंतर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरेंवर कविता केली आहे. या कवितेतून त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत टीका केली आहे. आता त्यांच्या या टीकेवर उद्धव ठाकरेंच्या सेनेकडून काय प्रत्युत्तर येणार हे पाहणं देखील पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

Published on: Jun 30, 2025 06:39 PM