Attari Border : घरा-दाराला कुलूप अन् शुकशुकाट… युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गावच सोडलं
पाकिस्तानपासून अटारी बॉर्डर साधारण ५०० मीटरच्या परिसरात वसलेलं भारतीयांचं शेवटचं गाव आहे. याच गावातील नागरिकांना या युद्धाचा फटका सहन करावा लागला. त्यामुळे अटारी सीमेवर असणाऱ्या लोकांनी गाव सोडलं आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर अटारी सीमेवर असणाऱ्या नागरिकांनी गावचं सोडल्याची माहिती समोर येत आहे. सीमावर्ती भागातील अनेक गावात लोक यायला तयार नसल्याची परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे. पाकिस्तानला लागून असणाऱ्या कानगड गावात अनेक घरं रिकामी झाली असल्याचे चित्र आहे. गेल्या दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव आहे. या भारत पाकिस्तान युद्धाच्या भितीने अनेक गावं खाली करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील युद्धाच्या झळा या पंजाब राज्यातील सीमावर्ती गावातील नागरिकांना सहन कराव्या लागताय. त्याचं कारण म्हणजे पंजाब राज्यातील जवळपास पाच जिल्ह्यातील ५०० किमीची बॉर्डर पाकिस्तानच्या सीमेला लागून आहे. जेव्हा या दोन देशात तणाव निर्माण होतो त्यावेळी सीमावर्ती भागातील गावांना टार्गेट केलं जातं. त्यामुळे या भितीने लोकं गाव सोडून गेल्याचे पाहायला मिळतंय.