CJP सह अनेक संस्थांचं टेन्शन वाढलं; विदेशी फंडिंगच्या दाव्यानंतर गृहराज्यमंत्र्यांचे थेट आदेश…

CJP सह अनेक संस्थांचं टेन्शन वाढलं; विदेशी फंडिंगच्या दाव्यानंतर गृहराज्यमंत्र्यांचे थेट आदेश…

| Updated on: Aug 01, 2026 | 3:24 PM

कॉक्रोच जनता पार्टीने (CJP) नीट पेपरफुटी आणि तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जंतरमंतरवर 35 दिवस आंदोलन केले. या आंदोलनानंतर सरकारने CJP संदर्भात मोठे पाऊल उचलल्याचे संकेत गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले आहेत. अनेक वेळा सीजेपीला विदेशी फंडिंग होत असल्याचा दावा करण्यात आला होता.

CJP ला परदेशातून निधी मिळतोय का, याची चौकशी सुरू असल्याची माहिती पंकज भोयर यांनी दिली. महाराष्ट्रात गृह विभाग आणि केंद्रात ED कडून CJP सह इतर फॉरेन फंडिंग घेणाऱ्या संस्थांची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. हा पैसा सकारात्मक कामासाठी वापरला जात असेल तर निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, देश, राज्य अथवा समाज अस्थिर करण्यासाठी त्याचा वापर होत असेल तर निश्चितपणे चौकशी करण्यात येईल, असे भोयर म्हणाले.

अभिजीत दिपके यांनी 16 मे 2026 रोजी CJP ही डिजिटल पार्टी सुरू केली होती. फॉरेन फंडिंगच्या आरोपांवर सरकारला संशय असेल तर त्यांनी चौकशी करावी, असे दिपके यांनी यापूर्वी म्हटले होते. आता या चौकशीतून काय समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.

Published on: Aug 01, 2026 3:24 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us