मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने…

मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने…

| Updated on: Oct 16, 2026 | 2:48 PM

करोल बागेत लहरा दो तिरंगा आंदोलनापूर्वी अभिजीत दीपके यांच्या निवासस्थानी दिल्ली पोलीस दाखल झाले आहेत. संसद मार्ग पोलीस स्टेशनचे अधिकारी दीपके यांच्याशी चर्चा करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आंदोलनाला स्थगिती देण्याची मागणी फेटाळल्यामुळे सायंकाळी आंदोलन होणार आहे. अटक होण्याची शक्यता दीपके यांनी व्यक्त केली होती.

कोकरोच जनता पार्टीच्या तिरंगा लहरा दो अभियानापूर्वी दिल्ली पोलिसांनी करोल बागेतील अभिजीत दीपके मुक्कामी असलेल्या ठिकाणी धडक दिली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महिला पोलीस आणि इतर कर्मचारी दीपके यांच्या मित्राच्या घरी पोहोचले. हे सर्व अधिकारी संसद मार्ग पोलीस स्टेशनचे आहेत. या परिसरात सकाळपासून पोलिसांची उपस्थिती नसताना, अचानकपणे पोलिसांचे पथक दाखल झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पोलीस अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी लहरा दो तिरंगा आंदोलनाला स्थगिती देण्याची मागणी फेटाळली होती, त्यामुळे हे आंदोलन होणारच आहे. सायंकाळी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरच पोलीस अभिजीत दीपके यांना भेटण्यासाठी आले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अभिजीत दीपके यांनी यापूर्वीच पत्रकारांशी बोलताना अटकेची शक्यता वर्तवली होती. पोलिसांची दीपके यांच्यासोबतची चर्चा काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Oct 16, 2026 2:48 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us