CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय…
नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभर उभारलेल्या आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टी (CJP) पुन्हा एकदा आक्रमक भूमिकेत आली आहे. आंदोलन संपुष्टात आल्यानंतरही विविध राज्यांमध्ये आंदोलकांवर कायदेशीर कारवाई आणि अटकसत्र सुरू असल्याचा आरोप करत CJPने केंद्र सरकारला इशारा दिला आहे.

CJPचे प्रवक्ते सौरभ दास यांनी दावा केला की, बिहार, आसाम आणि पश्चिम बंगालसह काही राज्यांमध्ये आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना आणि कार्यकर्त्यांना लक्ष्य केलं जात असून, त्यांच्याविरोधात कारवाई केली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. जर उद्यापर्यंत आंदोलकांवरील सर्व एफआयआर मागे घेण्यात आले नाहीत, तर पुढील भूमिका जाहीर करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, CJPच्या इशाऱ्यानंतर सरकारकडून आंदोलकांवरील एफआयआर मागे घेण्यात येतील आणि भविष्यात कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असं आश्वासन देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, प्रत्यक्षात काही राज्यांत कारवाई सुरूच असल्याचा दावा CJPने केला असून, याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
यापूर्वी सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी मान्य करण्यात आल्याचा दावा CJPने केला होता. तरीही काही ठिकाणी अटक आणि कायदेशीर कारवाई होत असल्याने सरकारने आपल्या आश्वासनाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर आंदोलनानंतरचा वाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, सरकार आणि CJP यांच्यातील पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.