महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आजपासून स्कूल ठीक करो या राष्ट्रव्यापी अभियानाचा शुभारंभ केला आहे. या मोहिमेला त्यांनी महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी येथील आपल्या मूळ गावातील शाळेतून सुरुवात केली. ग्रामीण भागातील शाळांची झालेली दुरावस्था आणि शिक्षणाची वाताहात या अभियानातून लोकांसमोर आणण्याचा दिपके यांचा मानस आहे. या अभियानाच्या सुरुवातीला दिपके यांनी शाळेला भेट […]
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आजपासून स्कूल ठीक करो या राष्ट्रव्यापी अभियानाचा शुभारंभ केला आहे. या मोहिमेला त्यांनी महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी येथील आपल्या मूळ गावातील शाळेतून सुरुवात केली. ग्रामीण भागातील शाळांची झालेली दुरावस्था आणि शिक्षणाची वाताहात या अभियानातून लोकांसमोर आणण्याचा दिपके यांचा मानस आहे.
या अभियानाच्या सुरुवातीला दिपके यांनी शाळेला भेट दिली असता, त्यांना शाळेच्या इमारतीची आणि सोयीसुविधांची गंभीर स्थिती आढळली. शाळेची एक खिडकी तुटलेली असून, ती एका बॅनरने झाकून ठेवल्याचे समोर आले. तसेच, शाळेतील स्वच्छतागृहही अत्यंत अस्वच्छ आणि वापरायोग्य नसलेल्या स्थितीत असल्याचे त्यांनी पाहिले. “अशा परिस्थितीत मुले शिकणार तरी कशी?”, असा प्रश्न दिपके यांनी यावेळी उपस्थित केला.
Published on: Aug 15, 2026 7:26 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
