Kunal Kamra : करेंगे दंगे चारो और.. हम होंगे कामयाब… विधानभवनातल्या राड्यानंतर कामरानं सरकारला डिवचलं
भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये विधानभवनाच्या लॉबीत जोरदार राडा झाला. या राड्याचे चांगलेच पडसाद पाहायला मिळत असताना कुणाल कामरानेही सरकारवर निशाणा साधलाय.
कॉमेडियन कुणाल कामरा याने महाराष्ट्र विधानसभेतील गोंधळावर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळालंय. इतकंच नाहीतर त्याने आपल्या सोशल मीडियावर विधानभवनाच्या लॉबीत झालेल्या राड्याचा व्हिडीओ शेअर करत त्याला कायदे मोडणारे असं कॅप्शनच दिले आहे. यासह ‘हम होंगे कामयाब’ या गाण्यावर आधारित त्याने एक विडंबनात्मक गाणं तयार करून सरकारव टीकास्त्र डागलंय. कुणाल कामरा याने शेअर केलेल्या विडंबनात्मक व्हिडीओमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) समर्थकांमधील हाणामारीच्या नाट्यमय क्लिप्स एकत्र केल्याचे पाहायला मिळालं. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो टाकत त्याने महायुती सरकारही निशाणा साधलाय.
काल विधानभवनाच्या लॉबीत आव्हाड आणि पडळकर समर्थकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर, आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याला पोलिसांनी अटक केली. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांच्या गाडीसमोर रात्री ठिय्या आंदोलन केले. रोहित पवार यांनीही या आंदोलनाला समर्थन दिल्याचे पाहायला मिळाले.
*Lawbreakers* pic.twitter.com/L8aiwvGlPw
— Kunal Kamra (@kunalkamra88) July 17, 2025
