मोठा दिलासा! आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 5% घसरण; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

मोठा दिलासा! आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 5% घसरण; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

| Updated on: Jul 27, 2026 | 11:59 AM

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण नोंदवली गेली आहे. ब्रेंट क्रूडच्या दरात सुमारे 5 टक्क्यांची घट झाली असून, त्याची किंमत घसरून 91.89 डॉलर प्रति बॅरलवर आली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण नोंदवली गेली आहे. ब्रेंट क्रूडच्या दरात सुमारे 5 टक्क्यांची घट झाली असून, त्याची किंमत घसरून 91.89 डॉलर प्रति बॅरलवर आली आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव काही प्रमाणात कमी झाल्याने आणि दोन्ही देशांमधील लष्करी कारवाया तात्पुरत्या थांबल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. याचाच परिणाम म्हणून कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाल्याचं मानलं जात आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील या घडामोडींमुळे आगामी काळात भारतातील इंधन दरांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरांमध्ये बदल होणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Published on: Jul 27, 2026 11:59 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us