Ajit Pawar Passed Away | लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळला

Ajit Pawar Passed Away | लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळला

| Updated on: Jan 29, 2026 | 11:49 AM

उपमुख्यमंत्री अजित पवार याचं अकाली निधन झालं आणि बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र एका क्षणात पोरका झाला आहे. बारामती येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. राज्य आणि देशातील बडे नेते यावेळी उपस्थित असून त्यांनी अजितदादांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार याचं अकाली निधन झालं आणि बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र एका क्षणात पोरका झाला आहे. बारामती येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. राज्य आणि देशातील बडे नेते यावेळी उपस्थित असून त्यांनी अजितदादांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं आहे. त्याचबरोबर अजितदादांसोबत दिवस रात्र झटणारे कार्यकर्ते धायमोकलून रडत आहेत. अजितदादा आपल्यात नाहीत ही कल्पनाच करता येत नसल्याने अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला आहे. लाडक्या अजित दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी विद्या प्रतिष्ठाणच्या मैदानावर लाखोंचा जनसागर उसळला आहे. अजितदादांचं कर्तृत्व किती प्रचंड मोठं होतं याची साक्षच ही गर्दी देत आहेत. महाराष्ट्राने अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रचंड हुशार राजकारणी गमावला अशी भावना जनसमुदायाकडून व्यक्त केली जात आहे.

Published on: Jan 29, 2026 11:49 AM