Video | फडणवीसांची शेवटची निवडणूक… उद्धव ठाकरेंच्या टीकेवर प्रत्युत्तर ऐकलंत?

| Updated on: Sep 22, 2022 | 1:10 PM

तुम्ही 2019 लाही माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला. तिघांनी मिळून एकत्रितपणे अडीच वर्ष मला संपवण्याचा प्रयत्न केला. पण मला संपवू शकला नाहीत. यापुढेही मला संपवू शकणार नाहीत, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.

Follow us on

सुनिल ढगे, नागपूरः देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणतात, मुंबईची ही माझी शेवटची निवडणूक आहे, पण आपण ही निवडणूक पहिली असल्या प्रमाणे लढायचं, असं आवाहन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल शिवसैनिकांना केलं. गोरेगाव येथील नेस्को संकुलावर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना  (Shivsena) गटप्रमुखांना संबोधित केलं.  देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंचं कालचं भाषण निराशेचं होतं. मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है.. वही होता है, जो तकदीर में लिखा होता है… तुम्ही 2019 लाही माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला. तिघांनी मिळून एकत्रितपणे अडीच वर्ष मला संपवण्याचा प्रयत्न केला. पण मला संपवू शकला नाहीत. यापुढेही मला संपवू शकणार नाहीत, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.