ऐसा कोई साथी हो…देवेंद्र फडणवीस यांनी गायलं गाणं, कुणाचा होता वाढदिवस? व्हिडीओ व्हायरल
नागपूरच्या स्वागत लॉनमध्ये झालेल्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन, परिणय फुके, आमदार संदीप धुर्वे हे उपस्थित होते. बघा देवेंद्र फडणवीस यांनी कसं गायलं गाणं अन् कोणी-कोणी दिली त्यांना साथ?
नागपूर, १३ डिसेंबर २०२३ : भाजपचे माजी मंत्री संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त काल नागपूरच्या स्वागत लॉनमध्ये छोटे खानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाणे गाऊन मंत्री संजय सावकारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले. देवेंद्र फडणवीस यांनी ‘नीले नीले अम्बर पर चाँद जब आये प्यार बरसाए हमको तरसाए ऐसा कोई साथी हो ऐसा कोई प्रेमी हो प्यास दिल की बुझा जाए’ हे गाणं गात मंत्री संजय सावकारे यांना संगीतमय अनोख्या शुभेच्छा दिल्यात. नागपूरच्या स्वागत लॉनमध्ये झालेल्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन, परिणय फुके, आमदार संदीप धुर्वे हे उपस्थित होते. बघा देवेंद्र फडणवीस यांनी कसं गायलं गाणं अन् कोणी-कोणी दिली त्यांना साथ?
Published on: Dec 13, 2023 03:51 PM
