Dharashiv | धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला आगीचे भडका
धाराशीवमधील कळंब परिसरातील महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. २ मे 2026 च्या सुरुवातीलाच मराठवाड्यात वाढलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
धाराशीवमधील कळंब परिसरातील महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. २ मे 2026 च्या सुरुवातीलाच मराठवाड्यात वाढलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. वाढते तापमान आणि उष्णतेमुळे उपकेंद्रावर मोठा ताण निर्माण झाला होता.
या आगीत सबस्टेशनचे मोठे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले असून, बचावकार्य सुरू आहे. परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने वीजपुरवठा काही काळासाठी बंद करण्यात आला आहे.
दरम्यान, मराठवाड्यात मे महिन्याच्या सुरुवातीलाच तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. उष्णतेमुळे वीज मागणीत मोठी वाढ झाली असून, ट्रान्सफॉर्मर आणि सबस्टेशनवर ताण येत आहे. त्यामुळे अशा घटना वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published on: May 02, 2026 4:05 PM
Follow Us