Ramesh Mhatre Case | दोन दिवस रुग्णालयात उपचार…आता थेट कोर्टात!; रमेश म्हात्रेंच्या भवितव्याचा आज फैसला होणार?
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरला मारहाण केल्याच्या गाजलेल्या प्रकरणात अटक करण्यात आलेले नगरसेवक रमेश म्हात्रे यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणातील पुढील न्यायालयीन सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, कोर्ट काय निर्णय देते याकडे राजकीय आणि वैद्यकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रमेश म्हात्रे यांची प्रकृती बिघडल्याने आणि उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवल्यामुळे त्यांना ठाणे येथील जिल्हा शासकीय (सिव्हिल) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर दोन दिवस उपचार करण्यात आले.
उपचारानंतर आज त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरवर झालेल्या कथित मारहाणीच्या घटनेमुळे राज्यभरातील डॉक्टरांमध्ये संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी विविध वैद्यकीय संघटनांकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर पुढील कोठडी, जामीन अथवा अन्य कायदेशीर निर्णय काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिसांकडूनही या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे.