Ahilyanagar | हुंड्याच्या छळाला कंटाळून विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल, थेट विहिरीतच मारली उडी; नवऱ्यासह तिघे जेरबंद
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील एकरूखे येथे हुंड्याच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रिया असे मृत विवाहितेचे नाव असून तिने विहिरीत उडी मारून आपले जीवन संपवले. मिळालेल्या माहितीनुसार, घराच्या बांधकामासाठी सासरकडून प्रिया हिच्याकडे चार लाख रुपयांची मागणी केली जात होती. ही मागणी पूर्ण न झाल्याने गेल्या जवळपास दोन वर्षांपासून तिचा सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता.
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील एकरूखे येथे हुंड्याच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रिया असे मृत विवाहितेचे नाव असून तिने विहिरीत उडी मारून आपले जीवन संपवले.
मिळालेल्या माहितीनुसार, घराच्या बांधकामासाठी सासरकडून प्रिया हिच्याकडे चार लाख रुपयांची मागणी केली जात होती. ही मागणी पूर्ण न झाल्याने गेल्या जवळपास दोन वर्षांपासून तिचा सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. वारंवार मारहाण होत असल्याने प्रिया अनेक वेळा माहेरी जात असे.
अखेर पुन्हा झालेल्या मारहाणीमुळे मानसिक त्रासाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणी मृत महिलेच्या कुटुंबीयांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी पती, सासू आणि सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून हुंडाबळीच्या घटनांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
