एअरबॅगमुळे भाजप खासदार सावरांचा थोडक्यात जीव वाचला, घोडबंदर रोडवर भीषण अपघात, डंपरच्या धडकेत कारचं मोठं नुकसान

एअरबॅगमुळे भाजप खासदार सावरांचा थोडक्यात जीव वाचला, घोडबंदर रोडवर भीषण अपघात, डंपरच्या धडकेत कारचं मोठं नुकसान

| Updated on: May 01, 2026 | 11:04 AM

पालघरचे भाजप खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात आज सकाळी घोडबंदर रोडवर घडला. खासदार सावरा यांच्या गाडीला एका डंपरने जोरदार धडक दिल्याने वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी डॉ. सावरा यांची गाडी मुंबईहून गुजरातच्या दिशेने जात होती. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या डंपरशी समोरासमोर धडक झाली. टक्कर इतकी जोरदार होती की गाडीचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने, गाडीत असलेल्या एअरबॅग्ज तात्काळ उघडल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
या अपघातात डॉ. सावरा हे पूर्णपणे सुरक्षित असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र, गाडीच्या चालकाला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती मिळताच नायगाव पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य सुरू करण्यात आले.
या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यामध्ये गाडीची झालेली मोठी हानी स्पष्टपणे दिसून येत आहे.

Published on: May 01, 2026 11:04 AM
Follow Us