DCM Health Update | मोठी अपडेट समोर! उपमुख्यमंत्री रात्री उशीरा 1 वाजेपर्यंत पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात असतानाच…

DCM Health Update | मोठी अपडेट समोर! उपमुख्यमंत्री रात्री उशीरा 1 वाजेपर्यंत पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात असतानाच…

| Updated on: Jul 04, 2026 | 10:43 AM

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या डॉक्टरांच्या विशेष पथकाकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. सततची धावपळ, अपुरी विश्रांती आणि वाढलेला कामाचा ताण यामुळे त्यांना अशक्तपणा आणि ताप आल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे हे राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामात व्यस्त होते यादरम्यानच ‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेतही व्यस्त असल्याचं सांगितलं जात होतं. काल रात्री उशिरापर्यंत ठाण्यातील गंगुबाई शिंदे सभागृहात राजकीय कार्यक्रम पार पडला. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या कार्यक्रमाला अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. रात्री 1 वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू होता.

सुत्रांच्या माहितीनुसार सततच्या दगदगीमुळे एकनाथ शिंदे यांची तब्येत खालावली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.

Published on: Jul 04, 2026 10:43 AM
Follow Us